Tuesday, November 14, 2017

रक्तदान... - by प्रथमेश


श्री श्री प्रथमेशरावसाहेबजी सुरळकर यांनी वेळात वेळ काढून,
अत्यंत अनमोल असे, परोपकारी, जनहितकारी, स्तुत्य, प्रशंसनात्मक असे कार्य... म्हणजेच,
'रक्तदान' केल्याबद्दल,
समस्त सुरळकर परिवारातर्फे त्यांचे हार्दीक अभिनंदन !

- अनुप
०३-०९-२०१७
२३:०७

अनिशला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा !!!


लांबच लांब ज्यांची दाढी,
कविता आवडतात ज्यांना लई भारी,
मैफल जमवतात दर मंगळवारी,
आणि,
ज्यांच्या फिदा ५६ डझन पोरी...
...
अश्या,
आपल्या सर्वांच्या लाडक्या,
मा. श्री. अनिशभाऊ व्यवहारे यांना,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

जय पोएट्री !

अमृताला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा !!!


IPhO ला ओळख झाली छान,
सिंहगड रोडची जी आहे शान,
शौकीन जिच्या काकांचं दुकान,
कथक आहे जिचा जीव की प्राण,
...
अशी आपली सर्वांची  लाडकी,
अतिशय चंचल,
संगणकतज्ञ,  नृत्यशास्त्रपारंगत,
सिंहगडरोडनिवासिनी,
*मा. कु. अमृतादेवी मोरे*
हिला प्रकटदिनाच्या अगणित शुभेच्छा !

- अनुप
१२-१०-२०१७
११:०१

आरतीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा !!!


सावधान, खबरदार, होशियार...

सूरज के सातवें घोड़े पर सवार,
सफेदी की चमकार,
मलिका ए कर्वे रोड,
ऑटोक्लेव्ह क्वीन,
पुस्तकी कीडा,
गरवारे टॉपर,
अॅपरन परिधान केलेल्या,

अशा त्या
मा. कु. आरतीदेवी सप्त(व)र्षि
(गरवारेतलं सातवं वर्ष! बाबो!!)

यांना प्रकटदिनाच्या भरभरून शुभेच्छा !

शुभेच्छुक :
ऑटोक्लेव्ह मजदूर यूनियन आणि
काकडी खिचडी फॅनक्लब !

- अनुप
०६-११-२०१७
२३:२७

Sunday, November 12, 2017

who cares if you ...

who cares if you ...
who cares if you are alone at new year's eve,
who cares if you have tears in eyes,
who cares if you don't want to talk,
who cares if someone breaks your heart,
who cares if you make a mistake,
who cares if you are dining alone,
who cares if you have lost your hope,
who cares if you are still awake at this time in night,
who cares if you ...


 - anup
01-01-2013
02:21

प्रीतेशच्या वाढदिवसाला पत्र ...

प्रिय मित्र प्रीतेश यास,

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

खूप प्रयत्न केला, करतोय, पण आपण पहिल्यांदा कधी भेटलो हे आठवतच नाहीये ! मात्र एकत्र मिळून केलेली धमाल नाही विसरू शकत...

खगोल मंडळ, बुधवारी सायनला लायब्ररीत भेटणे, वांगणीचे कार्यक्रम, बदलापूरचे कार्यक्रम, आणि मुंबईबाहेरचेही कार्यक्रम, टेलीस्कोप खांद्यावर घेऊन कुठे कुठे फिरलो !

इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनोमी ऑलिम्पियाडचे पंधरा एक्स्पर्ट इग्झामिनर्स, आणि ते होण्यासाठी केलेली रात्र-रात्र प्रॅक्टिस आणि त्या जीएमआरटीच्या मोठाल्या डिशेस...

तू एमएससीला असताना केलेला राजमाचीचा ट्रेक. रात्रीच्या अंधारातून वाट काढत माचीवर पोहोचताना झालेली पहाट; आणि पुण्यात परतल्यावर तीन-चार दिवस विद्यापीठातल्या हॉस्टेलवरचा मुक्काम.

नंतर तू आयुकात आल्यावर तुझ्या रूमवर रहायला यायचो, फुकटचं इंटरनेट वापरायचो, तिथल्या कॅन्टीनमध्ये तुझा गेस्ट म्हणून जेवायचो !

मग तू मुंबईला एचबीसीएसईमध्ये गेलास. त्यानंतर भेटलो ते दोन वर्षांपूर्वीच्या आयपीएचओमध्ये ! इमॅजिकाला जी धमाल केलेली, भेंडी ! नायट्रो, स्क्रीम मशीन, डेअर टू ड्रॉपमधून गोल्ड रशची ट्रेन बघताना काय फाटलेली तुझी !
दहा दिवस रोज परतल्यावर फाईव्ह स्टार हॉटेलचं जेवण, इतके वेगवेगळे डेझर्ट्स मी आयुष्यात कधी खाल्ले नसावेत ! बहुतेक तुझ्यामुळेच !!

आणि आत्ता काही महिन्यांपूर्वी तुझ्या घरी आल्यावर तू बनवलेलं पाणचट कोकम सरबत ! आणि अजून खूप आठवणी ...

खरंच एवढी वर्षं झाली पण !?
इतके पावसाळे संपले पण !?
आणि एवढे मोठे झालो पण !?
...
की आहोत अजूनही लहान !?
वांगणीतल्या त्या शाळेच्या मैदानावर लाल टॉर्च घेऊन,
ताऱ्यांच्या नकाशात एखादा मेसिअर शोधत !?

- अनुप
२९-१०-२०१७
०३:०१